Pawas : सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील पावस-पानगलेवाडी ते पावस बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. सुमारास करण्यात आली.

सुधीर दत्तात्रय घाटकर (वय ५०, रा. तांबळवाडी पावस, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल संतोष करळकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयिताच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 27/Sep/2025