Ratnagiri : साळवी स्टॉप येथील हेअर स्टुडिओला आग

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील हेअर स्टुडिओला शॉर्टसर्किटने आग लागली. आगीची माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासामध्ये ही आग अटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

ही घटना शुक्रवारी (ता. २६) दुपारी साळवी स्टॉप येथे निदर्शनास आली. या आगीमध्ये दुकानातील खुर्च्या जळून खाक झाल्या असून, साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 27/Sep/2025