Swachh Bharat Mission : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत चिपळुणात २३०० किलो कचरा संकलन

चिपळूण : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छता ही सेवा २०२५ महाश्रमदान एक दिवस, एक तास, एक साथ हा उपक्रम चिपळूण पालिकेने राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेंतर्गत शहरात विविध ठिकाणी स्वच्छतामोहीम राबवून २३०० किलो कचरा गोळा करण्यात आला आहे.

पालिकेकडून शहरात स्वामी समर्थ मठ मार्कंडी ते रामेश्वर मंदिर परिसरात स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, स्वच्छता निरीक्षक सुजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण, महाराष्ट्र हायस्कूल, आनंदराव पवार कनिष्ठ महाविद्यालय, डीबीजे कॉलेज विद्यार्थी, गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक होमकळस व नागरिक उपस्थित होते. गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याचे एमआरएफशेडमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून, पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे. सहभागींनी एकत्र येऊन परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 27/Sep/2025