Crime : तरुणीच्या मोबाईलवर विनयभंग करणारे संदेश व कॉल केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

राजापूर : राजापूर तालुक्यातील एका तरुणीच्या मोबाईलवर विनयभंग करणारे संदेश व कॉल केल्याप्रकरणी एकाविरोधात सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकाने व्हॉट्सअॅपवरून तरुणीला अनुचित संदेश पाठवले. संबंधित तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानुसार विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले, ‘महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये पोलिस कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत. संशयिताविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि हा खटला लवकरात लवकर फास्ट-ट्रॅकवर चालवण्यासाठी प्रयत्न केले जातील.’

दरम्यान, नवरात्र सुरू असताना असा प्रकार घडल्यामुळे या घटनेची दखल विभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम यांनी घेतली असून, संशयिताविरुद्ध तात्काळ योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 27/Sep/2025