कुडाळ : एकात्म मानवतावादाचा विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सर्वांना दिला आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य हिंदुत्वासाठी अर्पण केले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी संपूर्ण जीवन अर्पण करून दिले. आपणावर होणारे अन्यायाविरोधात लढण्यासाठी उपाध्याय यांचे विचार जागवणे गरजेचे आहे. त्यांचे जीवन चरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत गुहागर मतदार संघाचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी कुडाळ येथे व्यक्त केले. यावेळी त्यांनी पंडित दीनदडाळ उपाध्याय यांच्या जीवनातील जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जडणघडणीत उपाध्याय यांचे मोलाचे योगदान आहे त्यांनी संपूर्ण जीवन संघासाठी तसेच पक्षासाठी अर्पण करून दिले त्यामुळे त्यांची पुण्यतिथी अर्पण दिन म्हणून साजरी केली जाते असे यावेळी त्यांनी सांगितले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, रणजीत देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, भाई सावंत, रुपेश कानडे बंड्या सावंत पप्प्या तवटे तसेच भाजपा पदाधिकारी सरपंच बूथ कमिटी अध्यक्ष व सदस्य तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजप कुडाळ यांच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण देशभर सुरू असलेल्या सेवा पंधरवड्या निमित्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवनावर व कार्यावर आधारित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या रांगोळी स्पर्धेमध्ये समीर चांदरकर यांचा प्रथम क्रमांक आला. अक्षय कानविंदे यांचा दुसरा तर विजय मेस्त्री यांचा तिसरा क्रमांक आला आहे. तसेच विकास वराडकर, रामा बिबवणकर यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 27-09-2025












