Ratnagiri : दुसऱ्या पत्नीला भेटतो म्हणून तिघांकडून मारहाण

रत्नागिरी : माहेरी गेलेल्या दुसऱ्या पत्नीच्या घरी सातत्याने जाणे होते. या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अनोळखी तीन जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) सायंकाळी एमआयडीसी रेल्वे ब्रीज परिसरातील वर्कशॉपमध्ये घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची दुसरी पत्नी यांचे आपसात पटत नसल्याने ती माहेरी निघून गेलेली होती. तिला भेटण्यासाठी तिच्या माहेरी फिर्यादी हे वरचेवर जात असत. त्याचा राग मनात धरून तीन अनोळखींनी बुधवारी सायंकाळी एमआयडीसी रेल्वे ब्रीजच्या परिसरातील एका वर्कशॉपमध्ये घेऊन आले. तुमचा आता संबंध संपलेला असून, तू त्यांच्या मुलीला का त्रास देतोस? असे बोलून फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यातील एका संशयिताने वर्कशॉपमधील पाईपने फिर्यादी यांच्या डाव्या कुशीवर पाईप मारून दुखापत केली. त्यांना मुका मार लागला. तसेच शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तीन अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 27/Sep/2025