पावस : रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील श्री स्वामी देव व श्री गुरूदेव दास दिगंबर स्वामी यांच्या कृपेने मठामध्ये नवरात्रोत्सवदरम्यान ललिता पंचमी ते महानवमी असा पाच दिवसांचा श्री भगवती आणि परब्रह्म श्री स्वामी समर्थ देव यांचा पंचरात्रोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे.
आजपासून या उत्सवाला सुरुवात झाली असून, १ ऑक्टोबरपर्यंत उत्सव सुरू राहणार आहे. पंचरात्रोत्सव सोहळ्यामध्ये प्रथम दिन पंचमी श्री ललितादेवी पूजन, द्वितीय दिन षष्ठीदेवी पूजन, तृतीय दिनश्री महालक्ष्मी पूजन, चतुर्थ दिन श्री दुर्गादेवी पूजन, पंचम दिन श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली पूजन अशाप्रकारे कलश स्थापन करून पूजन होईल. कलशपूजनाला बसून पूजनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी नावे त्वरित मठामध्ये नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:17 PM 27/Sep/2025














