रत्नागिरी:
नवरात्रीच्या उत्साहाला साजरे करण्यासाठी रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील महिलांसाठी विशेष ‘उत्सव दांडिया’चे आयोजन करण्यात आले आहे. ना. उदय सामंत आणि आ. किरण उर्फ भैया सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या पुढाकाराने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठीचा हा विशेष कार्यक्रम २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० ते रात्री १० या वेळेत बाळासाहेब ठाकरे ॲक्टिव्हिटी सेंटर, साळवी स्टॉप येथे होणार आहे.
हा दांडिया उत्सव केवळ महिलांसाठी असल्याने, महिलांना कोणत्याही बंधनांशिवाय मनमोकळेपणाने दांडियाचा आनंद घेता येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या महिलांना प्रसिद्ध झुंबा ट्रेनर अंकिता प्रभू पाटकर दांडिया खेळण्याच्या सोप्या स्टेप्स शिकवणार आहेत. यामुळे दांडिया स्पर्धेत नव्याने सहभागी होणाऱ्या महिला आणि युवतींना सहजपणे दांडिया खेळता येईल. याशिवाय या कार्यक्रमात कोकणचा साज संगमेश्वरी बाज फेम तात्या गावकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
यावेळी केवळ दांडिया खेळण्याचाच नव्हे, तर बक्षिसे जिंकण्याचाही आनंद देखील महिलांना मिळणार आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी खास लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. यामुळे या ठिकाणी दांडिया खेळण्याचा आनंद लुटताना प्रभागातील महिलांना बक्षिसांची देखील लयलूट करता येणार आहे. आयोजक सौरभ मलुष्टे यांनी प्रभाग ५ आणि ६ मधील सर्व महिलांना या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याचे आणि दांडियाचा मनसोक्त आनंद लुटण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम महिलांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची एक उत्तम संधी देणारा असून या कार्यक्रमात अधिकाधिक महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तृप्ती वीरकर 9970567383, कीर्ती सावंत 9665736600, तेजस पाटील 9975292029, श्रद्धा पाटोळे 8830419432, फोरम पड्याळ 9920581501, सौरभ मलुष्टे 7972130853 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.














