साडवलीतील जखमी बिबट्याचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू

देवरुख : दहा दिवसांपूर्वी नजीकच्या साडवली कासारवाडी परिसरात जखमी अवस्थेत सापडलेल्या बिबट्याचा पुण्यात उपचारादरम्याने मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. स्थानिकांनी वन विभागाच्या मदतीने भरवस्तीत भटकणारा हा नर विबट्याला पकडले होते. यावेळी हा बिबट्या जखमी असल्याचे दिसून आले. प्राथमिक उपचार केले होते. तपासणीत डाव्या पायाला खोल जखम असल्याचे आणि उच्च तापामुळे तो शक्तीहीन झाल्याचे आढळले होते.

बिबट्याची परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील विशेष वन्यजीव उपचार केंद्रात हलवण्यात आले होते. त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच या बिबट्याने प्राण सोडला. यामुळे या बिबट्यावर केलेली उपचार निरर्थक ठरले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 29/Sep/2025