रत्नागिरी : तालुक्यातील जयगड- पेठवाडी येथे गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४० वा. सुमारास करण्यात आली. ओमकार नारायण होळंबर (३३, रा. जयगड पेठवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस हवालदार योगेश शेट्ये याने तक्रार दिली आहे. शनिवारी सायंकाळी संशयित हा विनापरवाना आपल्या ताब्यात १ हजार ९१० रुपयांची १८ लिटर गावठी दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 29/Sep/2025














