SWASTH NARI SASHAKT PARIVAR ABHIYAAN : ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’चा मंडणगडात १८६० जणांना लाभ

मंडणगड : राज्य शासनाचा ग्रामविकास व पंचायत विभाग, पंचायत समिती मंडणगड तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून तालुक्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानास सुरुवात झाली आहे. २५ सप्टेंबरअखेर तालुक्यातील एकूण १८६० लाभार्थीनी या शिबिराचा लाभ घेतला.

यामध्ये १११८ स्त्रिया, ७४२ पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात १५० इसीजी आणि रक्त तपासणी ९४२ कॅन्सर तपासणी करण्यात आली. १०२० आयुष्मान कार्ड काढण्यात आली. ५१५ जणांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. १०२ जणांची अवयव दान करण्यासाठी शपथपत्र शपथपत्रे घेण्यात आली. २ ऑक्टोंबरपर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे.

गुरुवारी मंडणगड पंचायत समितीचे राजमाता जिजाऊ सभागृहात महिला अधिकारी व शहरातील नागरीकांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभला. या उपक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, गटविकास अधिकारी सुनील खरात, गटशिक्षण अधिकारी कल्याणी मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 AM 29/Sep/2025