Ratnagiri : जयगड येथे रस्त्यावर विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड बौध्दवाडी ते गणेशवाडी जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. सुमारार करण्यात आली. सादिक आदम सोलकर (वय ६०, रा. अकबर मोहल्ला जयगड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस शिपाई रजनिकांत घवाळी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा शुक्रवारी सायंकाळी त्याच्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 29/Sep/2025