Mumbai- goa highway : महामार्गावर पादचारी व्यक्तीस अज्ञात वाहनाची धडक

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर २६ सप्टेंबर रोजी रात्री भीषण अपघात झाला. खवटी रेल्वे स्टेशनजवळील बुरटे वाडी येथे रात्री ठीक ९ वाजता एका पादचाऱ्यास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत पादचारी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर वाहन चालक पसार झाला. या घटनेची माहिती भरणे नाका पुला खाली असलेल्या नरेंद्र महाराज संस्थेच्या मोफत रुग्णवाहिका सेवेत कार्यरत असलेल्या चालक सुरज हंबीर यांना मिळाली.

त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीस उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले. रुग्णालयात जखमीवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 29/Sep/2025