Chiplun : भिले जांभळी बंदर येथे आढळला वृद्धेचा मृतदेह

चिपळूण : तालुक्यातील भिले येथील जांभरी बंदर येथील नदीपात्रात एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

निर्मला नारायण गुरव (वय ७६, रा. भिले ब्रम्हणवाडी, ता. चिपळूण) असे या घटनेतील महिलेचे नाव आहे. याबाबतची फिर्याद महेश गुरव यांनी चिपळूण पोलिस स्थानकात दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला गुरव या जांभळी बंदर येथे नदीच्या पात्रात पाण्यावर तरंगताना आढळून आल्या. त्यांना महेश गुरव यांनी कामथे उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 29/Sep/2025