खेड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर तसेच महाडनाका परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. या कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होत असून, कधीही ते लहान मुले स्त्रिया, पुरुषांवर हल्ला करतात. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील रहिवासी केतन आंब्रे व सहकाऱ्यांनी खेड नगर परिषदेकडे निवेदनाद्वारे केली.
काही दिवसांपूर्वी महाड नाका येथे ११ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला.
या घटनेनंतर त्या मुलाला तातडीने खेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नगर परिषदेने वेळीच पावले उचलावीत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज नगर व महाडनाका परिसरातील नागरिकांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 29/Sep/2025














