chiplun: चिपळुणात गुरुवारी संगीत बिबट आख्यानाचे आयोजन

चिपळूण : भारताच्या नाट्यपरंपरेत मैलाचा दगड ठरलेले, देशातील पहिले वन्यजीव नाटक म्हणून लौकिक मिळवलेले ‘संगीत बिबट आख्यान’ हे धमाल विनोदी नाटक २ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सादर होणार आहे. निसर्ग आणि मानवी सहजीवनाचा एक अदृश्य अध्याय उलगडणारे हे नाटक, केवळ मनोरंजकच नव्हे तर विचारप्रवर्तक अनुभव देईल. संगीत बिबत आख्यान हे केवळ एक नाटक नाही, तर ते वन्यजीवनाचे एक जिवंत चित्रण आहे.

हे नाटक विशेषतः भारतीय जंगलातील सर्वाधिक देखण्या आणि गूढ प्राण्यांपैकी एक असलेल्या बिबट्याच्या जीवनावर आधारित आहे. बिबट्याचे अधिवास, पिलांचे संगोपन, आणि मानवी वस्तीच्या वाढत्या प्रभावामुळे त्याच्या अस्तित्वाला निर्माण होणारे धोके हे सर्व नाट्यमय पद्धतीने यात गुंफले आहे. हे नाटक बिबट्या आणि मानव यांच्यातील शतकानुशतके चाललेला संघर्ष आणि सहजीवनाचा गुंतागुंतीचा धागा अतिशय संवेदनशीलपणे उलगडते. या प्रयोगासाठी प्रवेश विनामूल्य आहे. या कार्यक्रमाचे आयोजन वन विभाग रत्नागिरी यांनी केले असून तर कार्यक्रमाचे नियोजन चिपळूण वन परिक्षेत्र अधिकारी सरवर खान आणि त्यांचे कर्मचारी करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 29/Sep/2025