रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात चार महिने झालेल्या पावसामुळे भात शेती बहरली आहे. इतर जिल्ह्याप्रमाणे भात पिकांचे नुकसान फारसे झालेले नाही. सध्या हळव्या जातीचे भात पसवण्याच्या अवस्थेत आहे. भात पिकावर कोणत्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव नाही. येत्या चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पीक काढणीला घाई करू नये, दसर्यानंतर पावसाची परिस्थिती पाहून पीक काढणी करावी, असेही कृषी विभागातर्फे सांगण्यात आल आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरशा झोडपून काढले होते. तसेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे यंदा पेरण्या उशिराने झाल्या. जिल्ह्यात 55 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लागवड झाली आहे. मोठ्या प्रमाणात पिकांची वाढ चांगली झाली असून, उशिरा लागवड झालेल्या ठिकाणी अल्प प्रमाणात निभे भुंगरे, खोडकिडा यासह किडीचा प्रादुर्भाव झाला होता. कृषी विभागाने गाव बैठकांच्या माध्यमातून शेतकर्यांना किडी रोग नियंत्रणाबद्दल मार्गदर्शन, सूचना करण्यात आल्या आहेत. भात पिकाची वाढ चांगली झाली आहे. सध्या हळव्या जातीचे भात पसवण्याच्या अवस्थेत आहे. सध्या भात पिकावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव नाही, असेही कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
चार महिन्यात 203 हेक्टर क्षेत्रावर नुकसान
रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 2025-26 या वर्षी एप्रील ते ऑगस्ट या चार महिन्यात 1 हजार 364 शेतकर्यांचे 203.53 हेक्टर क्षेत्रावरील भात, नाचणीसह फळपीकांना फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान ऑगस्ट महिन्यात झाले आहे. त्यासाठी 32.89 लाखांची मागणीचा प्रस्ताव कृषी विभागाच्या वतीने शासनास पाठवण्यात आला आहे. नुकसानभरपाईची वाट शेतकरी पाहत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:09 29-09-2025














