Mandangad : सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश वास्ते यांना राज्य सरकारचा पुरस्कार जाहीर

मंडणगड : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश वास्ते यांना बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय सरकारचा २०२४-२५ या वर्षीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या वतीने नुकताच हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

श्री. महेश वास्ते कार्याबद्दल राज्य भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर जन्मदिन हा दरवर्षी अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अभियंताना शासनाच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

उपअभियंता महेश वास्ते यांना पुरस्कार जाहीर झाल्याबाबत सार्वजिक बांधकामचे रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, चिपळूणचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी त्यांचे कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 29/Sep/2025