खेड : कोकणात सध्या नारळाच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. ऐन नवरात्रोत्सवात भाविकांच्या खिशाला चटका बसला आहे. एक वर्षापूर्वी १३ रुपयांना मिळणारा नारळ आता तब्बल ३३ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. काही ठिकाणी हा दर ४५ रुपयांपर्यंत गेला असून, अचानक झालेल्या या दरवाढीचं गूढ अधिकच गडद झाले आहे. वाशी मार्केटमध्ये घाऊक दर वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांना दर वाढवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात नारळ हा महत्त्वाचा पूजासाहित्याचा घटक असल्याने, भाविकांना त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.
दरवाढीचा परिणाम सुके खोबऱ्याच्या किमतींवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिवाळीत खोबरे मोठ्या प्रमाणात वापरले जाते, त्यामुळे त्यावेळी दर आणखी वाढतील, अशी भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक आणि भाविकांना फटका बसला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 29/Sep/2025














