चिपळूण : बिगरपरवाना सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून जुगाराचा खेळ चालविणाऱ्या एका प्रौढावर चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनायक शांताराम उमासरे (वय ४०, रा. उक्ताङ-कानसेवाडी, चिपळूण) असे संशयिताचे नाव आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळी पेठमाप येथे करण्यात आली. या कारवाईमध्ये चिपळूण पोलिसांनी ७५२ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:52 PM 29/Sep/2025














