खेड : ई-केवायसी अपूर्ण असल्याने खेड तालुक्यातील तब्बल ८३८ शिधापत्रिकाधारकांना दणका देत रास्तधान्य दुकानावरून दिले जाणारे धान्य थांबवले आहे. सणासुदीच्या तोंडावर पुरवठा विभागाने धक्का दिला आहे.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासनाकडून सातत्याने सूचना करण्यात आली आहे. मात्र, या सूचनेकडे कानाडोळा करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्डधारकांचे रेशन बंद करण्यात आले आहे. तसेच ६ महिने धान्य दुकानातून उचल न करणाऱ्या कार्डधारकांनाही जिल्हा पुरवठा विभागाने दणका देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 29/Sep/2025














