Rajapur : गैरवर्तन करणाऱ्याला कठोर शिक्षा द्या; महिलांची पोलिस प्रशासनाकडे मागणी

राजापूर : तालुक्यातील तरुणीचा विनयभंग करणाऱ्या कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. तसेच, या गुन्ह्यात त्याला पाठीशी घालणारे आणि सहकार्य करणाऱ्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी पोलिसांची भेट घेऊन केली. राजापूर तालुक्यातील ग्रामीण महिलांची स्वावलंबी संघटना त्रिवेणी फेडरेशन राजापूर आणि महिला दक्षता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

दोषीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. तसेच, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी असेल तर त्यांचाही शोध घेऊन धडा शिकवावा, यासाठी आवश्यकता भासल्यास आम्ही मोठ्या संख्येने महिलांना घेऊन त्या लोकांच्या वरिष्ठांना भेटणार असल्याचेही या महिलांनी सांगितले. या वेळी अणसुरे, दांडे, दळे जैतापूर नाटे, मिठगवाणे, भालावली आडिवरे महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:17 PM 29/Sep/2025