रत्नागिरी : दहावीच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रत्नागिरीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ११ ट्रेडमध्ये प्रवेश मिळण्याची संधी आहे. या ११ ट्रेडमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार असून, त्यासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार असल्याचे प्राचार्य शशिकांत कोतवडेकर यांनी सांगितले. इयत्ता दहावी पूर्वपरीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आयटीआय प्रवेशाची संधी निर्माण झाली आहे. आयटीआय पास झाल्यावर शिकाऊ उमेदवारी, इयत्ता १२ वीची परीक्षा देता येऊ शकते. डिप्लोमा, इंजिनिअरिंगसाठी दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकतो. त्याचबरोबर दर महिन्याला ५०० रुपये विद्यावेतन अशा सुविधा उपलब्ध असल्याचे प्राचार्य कोतवडेकर यांनी सांगितले. दहावीची पूर्वपरीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयच्या डेस्कटॉप पब्लिशिंगमध्ये ३९ जागा, फूड प्रॉडक्शन जनरल ११ जागा, आयटीसीएसएम २ जागा, मशिनिस्ट ४ जागा, मशिनिस्ट ग्रैंडर २ जागा, एमएमटीएम ३ जागा, पंप ऑपरेटर व दुरुस्ती ११ जागा, सुईंग टेक्नॉलॉजी ११ जागा, टर्नर ३ जागा आणि वूड वर्क टेक्निशियनच्या १५ जागा उपलब्ध आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 22/Oct/2024












