Nagpur Madgaon Railway : ‘नागपूर-मडगांव’ रेल्वे कायमस्वरूपी करण्याची मागणी

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी सुरू झालेली विशेष रेल्वेगाडी नागपूर-मडगांव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण-सावंतवाडी (रजि.) संस्थेचे मध्य कोकण रेल्वे अभ्यासक वैभव बहुतुले यांनी केंद्रीयमंत्री यांच्याकडे केली आहे.

भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर येथून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली विशेष रेल्वेगाडी नागपूर-मडगांव प्रतीक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेस तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपी सुरू केली. त्याचा फायदा अनेक प्रवाशांना होणार आहे. तसेच या गाडीला चांदूर, मूर्तीजापूर, नांदुरा, बोदवड, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, पेण अतिरिक्त थांबा सुरू केला तर विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा येथील लोकांना होऊ शकतो. कोकणातील हापूस आंब्यासह प्रक्रिया पदार्थ या गाडीने खानदेश, विदर्भातील नागरिकांना घेता येतील. तसेच बेरोजगार तरुणांना, युवक-युवतींना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे, याबाबत वैभव बहुतुले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 30/Sep/2025\