Sangameshwar : महाआवास मध्ये दाभोळे क्लस्टर प्रथम

साखरपा : महाआवास अभियान अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे क्लस्टर हे प्रथम क्रमांकाचे ठरले आहे. या क्लस्टरअंतर्गत देवळे ग्रामपंचायत प्रथम ठरली असून, दाभोळे ग्रामपंचायतीस द्वितीय आणि भडकंबा ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांक मिळाला आहे.

राज्य पुरस्कृत रमाई तथा मोदी आवास योजनेसाठी कसबा हे क्लस्टर तालुक्यात सर्वोत्तम ठरले आहे. या क्लस्टर अंतर्गत हातिव ग्रामपंचायत प्रथम, कोंडये ग्रामपंचायत द्वितीय, तर निवे बुद्रुक तृतीय ठरली आहे. या योजनेंतर्गत सर्वोत्तम घरकुलांची निवड केली आहे. यात उमेश कोंडिबा कांदार यांचे बांधण्यात आलेले घरकुल प्रथम, उमेश संजीवन सावंत यांचे रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल द्वितीय आणि बोरसुत येथील रमेश सखाराम गमरे यांचे घरकुल तृतीय ठरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 30/Sep/2025