खेड : शहरातील भरणे येथील गॅरेजच्या समोरील मोकळ्या जागेत बॅनरवरील चित्रावर पैसे लावून प्लास्टिक मगमध्ये असलेल्या सोंगटीच्या साह्याने जुगाराचा खेळ खेळविणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून १५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजेश राजाराम कदम (वय ३९, रा. कोलखोट-कदमवाडी, चिपळूण) व हिदायत अब्दुल मुल्लाजी (५५, रा. साठेमोहल्ला, खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. ही कारवाई २७ सप्टेंबरला रात्री करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 30/Sep/2025














