Mandangad : कृषी समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मंडणगड : शेतकऱ्यांची प्रगतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने घोषित केलेल्या कृषी समृद्धी योजनेचा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर यांनी केले आहे.

या योजनेच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वाने शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहेत. शेतकरी सिंचन सुविधांची निर्मिती, कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन इत्यादीकरिता चाळीस ते पन्नास टक्के इतके अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळवू शकतात. योजनेत सहभागी होऊन लाभ मिळवण्यासाठी शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर सेंटरव्दारे थेट अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अहिरकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 30/Sep/2025