चिपळूण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत आणि राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा रत्नागिरी आणि भारतीय जनता पार्टी रत्नागिरी यांच्या वतीने चिपळूण येथे आयोजित जिल्हास्तरीय नमो युवा रन मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३ कि. मी आणि ५ कि. मी. अशा दोन प्रकारांमध्ये ही स्पर्धा खेळविण्यात आली. यामध्ये ९०० हून अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला.
या सर्व स्पर्धकांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मेडल, सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक टी-शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले. चार गटांमध्ये खेळविल्या गेलेल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये ७५ हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली होती. या संपूर्ण स्पर्धेचे नियोजन भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेला भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, चिपळूण संगमेश्वर विधानसभा भाजपा नेते प्रशांत यादव, चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत, डॉ. तेजानंद गणपत्ये, डॉ. मनीषा वाघमारे, इंटरनॅशनल रनर संध्या दाभोळकर, जिल्हा सरचिटणीस प्रणाली सावर्डेकर, निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, चिपळूण पूर्व तालुकाध्यक्ष विनोद भुरण, चिपळूण पश्चिम तालुका अध्यक्ष उदय घाग, गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर, चिपळूण शहराध्यक्ष शशिकांत मोदी, माजी नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू, मधुकर निमकर, सरपंच संघटनेचे चिपळूण तालुका अध्यक्ष योगेश शिर्के, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली निमकर, महिला मोर्चा शहराध्यक्ष रसिका देवळेकर, डॉ. स्वामिनी आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत १८ वर्षांखालील ३ कि.मी. मुलांच्या गटात शुभम शितप, पृथ्वी राजभर, रोहित राठोड, अथर्व दवंडे, आयुष विजे, सुजल घाणेकर, विपुल साळवी, विराज निवाते यांनी अनुक्रमे यश मिळविले. ३ कि.मी. मुलींच्या गटात इच्छा रानबार, उमेरा सय्यद, सानिका डिके, अनुष्का खेराडे, साजिरी पावसकर, मृणाली खेराडे, श्रेया बने, वैभवी सोलकर, वैभव ढगळे. ५ कि.मी. खुला गट पुरुष-सिद्धेश बर्जे, सूरज कदम, ओंकार बैकर, यश शिर्के, स्वराज जोशी. महिलांच्या गटात खुशी हसे, प्रमिला पाटील, तन्वी मल्हार, कोमल मोहिते, श्रुतिका वरक आदींनी अनुक्रमे यश मिळविले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 30/Sep/2025














