Khed : आय.सी.एस महाविद्यालयात सशक्त नारी अभियान

खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्या वतीने सशक्त नारी अभियानचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. परेश मळणगावकर व सिस्टर महाडिक यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना स्त्रीत्वाचे महत्त्व, वयानुसार होणारे शारीरिक बदल तसेच मासिक पाळीशी संबंधित शंका यावर मार्गदर्शन केले.

यावेळी प्राचार्या डॉ. अनिता आवटी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. एम. के. केळकर, प्रा. एस. व्ही मस्के आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. सुप्रिया काडगे, तर आभार प्रदर्शन महिला विकास कक्षाच्या प्रा. राखी शेठ यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 30/Sep/2025