Sangameshwar : तालुका विज्ञान नाट्य स्पर्धेत कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूल प्रथम

कडवई : संगमेश्वर तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२५ अंतर्गत ताम्हाने हायस्कूल येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. विज्ञान नाटिकेसाठी देण्यात आलेल्या मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांतर्गत ‘डिजिटल भारत : जीवन सक्षमीकरण’ हा विषय निवडण्यात आला होता.

आधुनिक भारताचे स्वप्न दाखविण्याचे काम या नाटिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या नाटिकेत अर्णवी कानाल, सिद्धी उजगावकर, नीरजा बोबले, श्रवण हरेकर, वेदांत सावरटकर, देवान किंजळकर, संग्राम ओकटे, विराज वारोशे, आयुष ओकटे, गौरव गुरव या विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या आहेत. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक सूरज कदम, सिमीन काझी व राजेश खेडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 30/Sep/2025