Chiplun Nagar Parishad : चिपळूण नगर परिषदेतर्फे ‘वेस्ट टू आर्ट’ उपक्रम

चिपळूण : स्वच्छ सर्वेक्षण २०२५, स्वच्छता पंधरवडा आणि स्वच्छता ही सेवा अभियान या उपक्रमांतर्गत चिपळूण नगर परिषदेने टाकाऊपासून टिकाऊ (वेस्ट टू आर्ट), स्वच्छता प्रतीक्षा आदी उपक्रमांचे आयोजन केले आहे.

मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, स्वच्छता निरीक्षक सुजित जाधव यानी हा उपक्रम घेतला. यावेळी कार्यालयीन अधीक्षक रोहित खाडे, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, नगर अभियंता दीपक निंबाळकर, अग्निशमन अधिकारी आनंद बामणे, संगणक विभागप्रमुख निवेदिता आंबेकर व विद्युत अभियंता संगिता तांबोळी आदी नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. मृणाल जोशी यांनी सहभागींना प्रशिक्षण दिले. शहरातील महिला बचत गटातील सुमारे ८१ महिलांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 30/Sep/2025