देवरुख : बालमनावर सुसंस्कृत संस्कार करणाऱ्या शालिनी व सहकार क्षेत्रासाठी योगदान दिलेले सदानंद बंदरकर या दाम्पत्याच्या स्मरणार्थ देवरुख येथील श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयातर्फे ५व्या कथालेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून कथेसाठी विषय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. कथा स्वरचित कथा मराठी भाषेतून शब्द व कमाल स्पर्धकाला असणार असावी आणि ही किमान २००० २५०० कथा ३१ शब्दांची असावी. ऑक्टोबरपर्यंत ग्रंथपाल यांच्याकडे वाचनालयात कार्यालयीन वेळेत आणून द्यावी अथवा कुरियर किंवा पोस्टाने श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, मु. पो. देवरुख (मधली आळी), मोडक गार्डन मागे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी, पिन ४१५८०४ या पत्त्यावर पाठवावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
स्पर्धेत गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या तीन स्पर्धकांना ग्रंथभेट, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र दिले जाणार असून, उत्तेजनार्थ कथांची निवड केली जाणार आहे. या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रथम क्रमांकास १००१ रुपये, द्वितीय ७५१ रुपये, तर तृतीय क्रमांकास ५०१ रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेचा निकाल १५ डिसेंबरदरम्यान जाहीर केला जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 30/Sep/2025














