संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समितीच्या सदस्यपदी राजापूरातील शिवाजी पवार यांची निवड

राजापूर : ग्रामविकास विभागाअंतर्गत शासनातर्फे अशासकीय समित्यांच्या तीन वर्षांच्या निवड करण्यात आल्या असून या अंतर्गत संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी समितीच्या शिवाजी पवार अशासकीय सदस्यपदी राजापूर तालुक्यातील कोंढेतड येथील बंजारा बहुउद्देशीय समाज सेवा संघाचे राजापूर तालुका, सचिव शिवाजी पवार यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड शासनातर्फे आयोजित एका बैठकीत करण्यात आली.

तांडा गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणे, तांडा गावाला महसुली गाव घोषित करणे, अन्य आवश्यक विकासकामे करणे हे समिती समोर उद्दिष्टे आहेत. या समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल शिवाजी पवार यांचे तालुक्यातून अभिनंदन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 22/Oct/2024