रत्नागिरी : सेवा पंधरवड्यांतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रमात फणसोप मंडलामध्ये शाळा तेथे दाखला उपक्रम पार पडला. या उपक्रमाचा दोनशेहून ग्रामस्थांनी लाभ घेतला. लक्ष्मी केशव शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात हे शिबिर पार पडले. यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अप्पर प्रांताधिकारी जीवन देसाई, अँटी करप्शन ब्युराचे उपअधीक्षक अविनाश पाटील, निवासी नायब तहसीलदार माधवी कांबळे, लक्ष्मी केशव शिक्षण संस्थेचे कमलाकर साळवी, प्राचार्य नेत्रा राजेशिर्के, ग्रामपंचायत सदस्य रितेश साळवी, मिलींद कांबळे, समद भाटकर, राखी चौघुले, पुरवठा विभागाच्या माधवी दाभाडे यांच्यासह मंडळातील सर्व पोलिस पाटील, सेतू कर्मचारी, आधार केंद्रचालक उपस्थित होते.
यावेळी उत्पन्नाचे २७, अधिवास १९, जातीचे १९ दाखले सेतूमध्ये जमा असून लवकरच त्याचे वितरण होईल तर उत्पन्नाचे ८ दाखले, जातीचे ३, नॉन क्रिमिलेअर १ दाखल्याचे वाटप केले. ४० लाभार्थ्यांचे आधार अपडेट करण्यात आले.
पाचजणांना सातबारा वाटप करण्यात आले. फेरफार ३ लाभार्थ्यांना, चारजणांना ई-रेशनकार्ड वाटप, १३ लाभार्थ्यांचे रेशनकार्ड नाव कमीजास्त करण्यात आले. संजय गांधी योजनांचे ४ लाभार्थी तर ५ विद्यार्थी खेळाडूंचा सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे व प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पाच गरीब विद्यार्थ्यांची ११,६०० रुपयांची फी फणसोप मंडल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी फी भरल्याने, शिक्षणामधील अडथळे बाजूला झाले आहेत. ग्रामस्थांनी याबाबत त्यांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 30/Sep/2025














