Marathwada Flood : चिपळूण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात!

चिपळूण : चिपळूण शहरातील चिपळूणचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केवळ धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमातच नव्हे तर सामाजिक कार्यातही अग्रेसर असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. संपूर्ण मराठवाड्यातील पूरस्थितीमुळे जवळपास ८०० गावे बाधित झाली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मौजे पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथील ३५० बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी चिपळूण प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांनी चला देऊ हात मदतीचा, आपल्या कृतज्ञतेचा असे आवाहन केले होते.

या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत चिपळूणचा महाराजा सार्वजनिक मंडळ यांनी प्रांताधिकारी यांच्या समन्वयातून पाकणी गावाला ७५० किलो गहू, २५० किलो तांदूळ आणि बिस्किट पुडे अशी जीवनावश्यक मदत पुरवली. या उपक्रमासाठी मंडळाचे उपाध्यक्ष बाळा कदम, कार्याध्यक्ष सुहास (तात्या) खरे व विभागातील ज्येष्ठ व्यक्ती नितीन कोवळे यांनी विशेष आर्थिक सहकार्य केले. चिपळूणचा महाराजा सार्वजनिक मंडळाच्या योगदानामुळे चिपळूणच्या सांस्कृतिक भूमीच्या कृतज्ञतेची प्रचिती पुन्हा एकदा समाजासमोर आली. तसेच मदतीचे साहित्य प्रांतधिकारी आकाश लिंगाडे, न.प. मुख्यधिकारी विशाल भोसले यांच्याकडे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष बाळा कदम, सुनील गुरव, बंधू कदम, पराग पवार, मंदार शिंदे, साई कदम, निखिल पवार, सिद्देश गुरव, सुनिल विश्वकर्मा, तेजस शिंदे, राहुल गुरव, अमोल गोरिखले, आयुष कुबडे, आदित्य पेडणेकर, कुलदीप जडेजा, शुभम अवसारे, हे उपस्थित होते.

तसेच सर्व नियोजनासाठी आकाश कदम, बाळा कदम, पराग पवार, कैलास मिरकर, यश कोवळे, शुभम शिंदे, पार्थ गुरव, पियुष गुरव, नीरज गुरव, तन्मय गुरव, नीरज चव्हाण, वीर जगदाळे, राजेश कदम आदी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 30/Sep/2025