संगमेश्वर : कोणतीही गोष्ट कष्टाने शक्य करता येते. जिद्दीने मनाशी ठाम खूणगाठ बांधून महिलांसाठी अवघड समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात ट्रेन ऑपरेटर (मेट्रोचालक) पदावर संगमेश्वर तालुक्यातील माभळे घडशीवाडीतील कन्या राखी घडशी हिने मेट्रोचालक म्हणून नावलौकिक मिळवला.
संगमेश्वर येथील पैसाफंड प्रशालेमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेऊन सावर्डे येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा दोन वर्षाचा कोर्स केला. कारण, इतर कोठे अन्य मोठ्या प्रकारचे शिक्षण घेणे परिस्थितीमुळे शक्य नव्हते. तिने ऑनलाईन भरतीसाठी अॅप्लिकेशन केले. योग्य प्रकारे सर्व गोष्टी पूर्ण करून त्यामधून तिची ही निवड झाली. त्यानंतर तीन महिन्याचे खास प्रशिक्षण होऊन मेट्रोचालक पदावर रूजू झाली.
ही बाब येथील अनेक महिलांसाठी व कुटुंबासाठी नक्कीच भूषणावह आहे. ती ज्या वेळी काही दिवसांसाठी आपल्या गावाला आली होती त्या दरम्यान संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे व प्रशांत शिंदे आदींनी तिचा सत्कार केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 30-09-2025














