साडवली : संगमेश्वर तालुक्यातील दोन फ्लाईंग स्कॉडच्या माध्यमातून कोसुंब फाटा व मार्लेश्वर तिठा या दोन ठिकाणी तब्बल १५६ गाड्यांची तपासणी करण्यात आली.
गटविकास अधिकारी भरत चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तर देवरुखचे मुख्याधिकारी चेतन विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली एक अशी दोन फ्लाईंग स्कॉड या दोन ठिकाणी वाहनांची तपासणी करत आहेत. या दोन फ्लाईंग स्कॉडच्या अधिपत्याखाली सहा पथकांतील सुमारे १८ अधिकारी, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये काहीही आक्षेपार्ह मिळून आले नसल्याची माहिती तालुका प्रशासनाकडून देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 22-10-2024












