Chiplun DBJ College : डीबीजे महाविद्यालयच्या राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे स्वच्छता अभियान

चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने १९ महाराष्ट्र बटालियन युनिटने ३०० वर्षे पूर्ण झाली, याबद्दल वनवरात्री उत्सवाच्या निमित्ताने विंध्यवासिनी परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी ४० कॅडेटने सहभाग घेतला, तसेच या अभियानाला माजी नगरसेवक सुनिल कुलकर्णी, झुलॉजीचे विभाग प्रमुख प्रा. सुहास वाघमोडे यांनी सक्रीय सहभाग घेतला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्वच्छता अभियानाचे सर्व भाविक व मंदिर प्रशासनाने कौतुक केले. लेफ्टनंट प्रा. मधुसूदन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान यशस्वी झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 30/Sep/2025