गणपतीपुळे : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील जी. एम. शेट्ये हायस्कूलच्या एकूण सात खेळाडूंची फिटा व कंपाऊंड या प्रकारात विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यामध्ये समृध्दी योगेश कदम हिने १९ वर्षे वयोगटाच्या आतील मुलीच्या संघात फिटा या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला, तर शार्दूल योगेश कदम याने १४ वर्षे वयोगटाच्या आतील गटातील मुले कंपाऊंड या प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.
तसेच शर्विन विक्रम कदम याने १७ वर्षे वयोगटाच्या आतील मुले फिटा या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. त्याचबरोबर या शाळेतील आर्यन विलास चौगुले यांने १९ वर्षे आतील मुलगे कंपाऊंड या प्रकारात प्रथम क्रमांक, राधिका राजन सुर्वे हिने १७ वर्षे आतील मुली कंपाऊंड या प्रकारात प्रथम क्रमांक, साक्षी अरूण घुमे हिने १४ वर्षे आतील मुली, फिटा या प्रकारात तृतीय क्रमांक, आणि अगदी नाजुक व छोटी स्पर्धक श्रावणी नितीन घोसाळकर हिने १४ वर्षे आतील कंपाऊंड या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या सर्व स्पर्धकांना क्रीडा शिक्षक नवनाथ जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक नाईक यांचे प्रोत्साहन लाभले. या यशस्वी खेळाडूचे जी. एम. शेट्ये हायस्कूलच्या संचालकांनी कौतूक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 30/Sep/2025














