Khed : चोरटी नदीच्या डोहात सापडला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

खेड : तालुक्यातील कळंबणी येथील चोरटी नदी येथील गुणगुण डोहात रविवारी दुपारी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. याबाबत पोलिस पाटील नरसिंह सुतार यांनी खेड पोलिसांना माहिती दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

मृतावस्थेत सापडलेल्या पुरुषाचे अंदाजे वय ४८ ते ५० दरम्यान आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम खेड पोलिसांकडून सुरू आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 30/Sep/2025