राजापूर : नाटे येथील चिंचबंदर जुनी तर येथे रस्त्याच्या बाजूला दुचाकी उभी करुन मासेमारीसाठी गेलेल्या तांडेलची दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली. ही चोरी शनिवारी दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी नाटे सागरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तुषार एकनाथ आडिवरेकर (वय ४५, रा. तुळसुंदे – उगतवाडी, राजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ते इशराक भाटकर यांच्या बोटीवर तांडेल म्हणून काम करतात. बोटीवर जाण्यासाठी ते २६ रोजी दुपारी दुचाकी (एमएच ०७, एके ८१७०) घेऊन आले होते. रस्त्याच्या बाजूला दुचाकी उभी करुन ते मासेमारीसाठी गेले होते. हवामान खराब असल्याने ते २७ रोजी परत जेटीवर आले असता त्यांनी दुचाकी चोरीला गेल्याचे पाहिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 30/Sep/2025














