अडरे : महिलांनी प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणे ही काळाची गरज आहे. पहिल्या काळी महिला चूल आणि मूल यामध्ये अडकल्या होत्या. मात्र आता, चूल आणि मूल यामध्ये न अडकता, महिला धैर्याने सर्व संकटांना सामोरे जात मोठमोठ्या पदांवर पोहोचत आहेत आणि आपली कर्तृत्व सिद्ध करत आहेत. हे कौतुकास्पद असल्याचे स्नेहबंध मंचाचे अध्यक्ष सिताराम शिंदे यांनी प्रतिपादन केले.
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या डॉ. सुमिता शिर्के आणि चिपळूण येथील आगार वाहतूक निरीक्षक नंदिनी कदम यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चिपळूण येथील स्नेहबंध मंचतर्फे सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम चिपळूण तालुक्यातील कोढे येथील रिगल महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, सचिव विकास ढवन, मार्गदर्शक विनायक घटे, संचालक प्रकाश सावर्डेकर, विजय थोरे, पांडुरंग लकडे, नारायण खेडेकर, नसरीन खडस, अमिना मोमीन, प्राचार्य पूनम गुरव, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार आवळे, प्रा. अजिंक्य शिंदे, प्रबोध काळे यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. प्राचार्य पूनम गुरव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विजय थोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश सावर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर मंदार आवळे यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:38 PM 30/Sep/2025














