रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ही स्पर्धा दि. २ ऑक्टोबर २०२५ ते दि. ३१ मे २०१६ या कालावधीत घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन केले आहे.
गतवर्षी या स्पर्धेत एकूण ४७ नाटकांचे प्रत्यक्ष सादरीकरण झाले होते. या स्पर्धेला दि. २ ऑक्टोबरपासून प्रारंभहोणार आहे. स्पर्धा प्रमुख म्हणून अमेय धोपटकर काम पाहणार असून, मुख्य समन्वयक म्हणून वामन कदम, सतीश दळी काम पाहणार आहेत. संतोष सनगरे हे स्पर्धेसाठी सहकार्य करणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अन्य माहितीसाठी नाट्य निर्मात्यांनी अमेय धोपटकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेने केले आहे.
सन २०२५-२६ च्या स्पर्धेची सुधारित नियमावली जाहीर करून प्रवेश अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त उत्सव मंडळांनी उत्सवासाठी तयार केलेलेच नाटक स्पर्धेत सादर करावे तसेच लोककलापाठोपाठ नाट्यकला ही इथल्या संस्कृतीचा भाग असून, आपण तो वारसा स्पर्धेच्या माध्यमातून जपत आहे. – उदय सामंत, पालकमंत्री.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 30/Sep/2025














