Navaratri 2025: करवीरनिवासिनी अंबाबाईची अष्टमीदिवशी महिषासुरमर्दिनी रूपात पूजा!

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या नवव्यादिवशी मंगळवारी आश्विन शुक्ल अष्टमीदिवशी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली.

कोणे एकेकाळी रंभ नावाच्या दैत्याने उपासना करून भगवान शंकराकडे त्यांच्यासारखा पराक्रमी पुत्र देण्याचे वरदान मागितले. शंकरांनी आपलाच एक अंश पुत्ररूपात प्रकट होईल, असे वरदान दिले. त्यातून उग्र महिषासुर प्रकट झाला. त्याने सर्व देवांचे सर्व अधिकार काढून घेतले. देवांवर झालेले अन्याय ऐकून भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मा यांच्या शरीरातून तेज बाहेर पडले. त्या तेजात सर्व देवांचे तेजही एकत्र झाले आणि तिथे सर्व दिशांची पोकळी व्यापणारी अशी एक तेजाची शलाका प्रकट झाली. देवीला सर्व देवांनी आपापली शस्त्रे दिली. शंकराने त्रिशूल, विष्णूने चक्र, वरुणाने शंख, अग्नीने शक्ती, वायूने धनुष्यबा भाता, इंद्राने वज्र ऐरावताची घंटा, यमाचा दंड, वरुणाने पाश प्रजापतीची अक्षमाल ब्रह्मदेवाने कमंडलू, सूनि रोमरोमातील तेज, कधी न मळणारी वस्त्रं, किरी कुंडल चंद्र आणि बाजुबंद दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 01-10-2025