देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे चटकवाडी येथील आंब्याच्या बागेत असलेल्या घराच्या शेजारील गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन पाण्याचे पंप चोरी प्रकरणातील दोन आरोपींना मुद्देमाला सकट संगमेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरी प्रकरणी संगमेश्वर पोलिसांत गु.रजि. नं. १११/२०२५, भादंवि कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना दिनांक ०६ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत घडली होती. फिर्यादी शांताराम जयराम पाटोळे (वय ८० वर्षे, रा. तळे, चटकवाडी) यांनी याबाबतची तक्रार दाखल केली होती.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना करून कार्यवाही सुरू केली. गोपनीय माहितीच्या आधारे २७ सप्टेंबर रोजी तळेकांटे येथून मयुर संजय मांजरेकर (वय २५) आणि मयुर अनंत कांबळे (वय ३०, दोघे रा. बौद्धवाडी, तळेकांटे) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीस गेलेले दोन पंप आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ६० हजार रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, तसेच उपविभागीय अधिकारी नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण (संगमेश्वर पोलिस ठाणे) यांच्या सूचना व नेतृत्वात करण्यात आली. या तपास पथकात सपोफौ गावीत, कोलगे, मनवल, पोलिस बरगाले व पोलिस कॉन्स्टेबल खरपे यांनी सहभाग घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 01/Oct/2025














