Ratnagiri: रत्नागिरीतील 16 अनधिकृत बांधकामे नगरपरिषदेकडून जमीनदोस्त

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथे गटारावरील अनधिकृत पक्के बांधकाम आणि साळवी स्टॉप येथील जलतरण तलावामागे बांधलेले 15 गाळे, एक रॅम्प रत्नागिरी नगरपरिषदेने जमीनदोस्त केले. पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या मदतीने मंगळवारी ही अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम राबवली. शहरातील अनेक ठिकाणी गटारांवरील बांधकामांसह अनधिकृत शेड, ओट्यांची यादी बनवली असून, टप्प्याटप्प्याने ही कारवाई केली जाणार आहे.

कोकणनगर येथील अकबर होडेकर यांनी गटारावर पक्की शेड बांधल्याची तक्रार रत्नागिरी नगर परिषदेकडे आली होती. तर जलतरण तलावामागील पंधरा गाळे आणि एका रॅम्पचे अनधिकृत बांधकाम हटवण्याबाबतचे नियोजन करण्यात आलेे. त्यानुसार मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी बांधकाम, नगरविकास आणि मालमत्ता विभागाला अतिक्रमण हटवण्याबाबतची कारवाई करण्याचे निर्देश दिले. कोकणनगर येथील गटारावर बांधकाम करणार्‍या अकबर होडेकर यांना बांधकाम स्वत:हून काढण्याबाबत नोटीस बजावली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 01-10-2025