गोमातेला राज्यमाता दर्जा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मंत्री उदय सामंत यांचा साधू संतांच्या हस्ते गोमाता देऊन सन्मान

◼️ गोमातेला निवासस्थानी आणून ना. उदय सामंतांनी केले गोमातेचे पूजन

रत्नागिरी : महाराष्ट्रात ‘गोमातेला राज्यमाता’ दर्जा मिळवून देण्याच्या ऐतिहासिक निर्णयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मंत्री उदय सामंत यांचा कोल्हापूर येथील अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज ह्यांच्या कणेरी मठ येथे साधू संतांच्या शुभहस्ते गोमाता देऊन सन्मान करण्यात आला.

आज ना. उदय सामंत यांनी आपल्याला सन्मानार्थ मिळालेल्या गोमातेला आपल्या पाली येथील निवासस्थानी आणून गोमातेचे पाली येथील निवासस्थानी पूजन करण्यात आले. या पावन प्रसंगी गोमतेचे मंगल असे नामकरण करण्यात आले.

सत्कारा समयी बोलताना, गोमाता ही भारतीय संस्कृतीतील पवित्र मानली जाते. राज्य सरकारने गोमातेला राज्यमाता दर्जा देऊन भारतीय संस्कृती आणि परंपरेचे संरक्षण करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे मंत्री उदय सामंत यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या पुण्यकार्याबद्दल संपूर्ण राज्य त्यांचे आभार मानते, असे गौरवोद्गार साधू संतांनी काढले. तर या पावन प्रसंगी मंत्री उदय सामंत म्हणाले, “गोमाता ही आपल्या भारतीय संस्कृतीची जीवनदायिनी आहे. तिला राज्यमाता दर्जा मिळाल्याने संपूर्ण देशाला गर्व वाटतो. मी या पावन प्रसंगी सर्व भक्तांचे आभार मानतो.”

याप्रसंगी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:03 22-10-2024