रत्नागिरी : बंदरावर मिरकरवाडा स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय होत असल्याने या बंदरावर स्वच्छतागृह उभारण्याची विनंती रत्नागिरी मच्छीमार खलाशी आणि कामगार कल्याणकारी संघटना अध्यक्ष व भाजपाचे शहर सचिव समीर वस्ता यांनी केली. याबाबतचे निवेदन पतन विभागाच्या कार्यकारी अभियंता वीणा पुजारी यांना दिले आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहर अध्यक्ष दादा ढेकणे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात लक्ष ठेवून सामाजिक हिताची कामे करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार नूतन शहर सचिवांनी समिर वस्ता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मिरकरवाडा बंदरावरील गैरसोयीबाबत आवाज उठवला आहे.
मिरकरवाडा बंदर हे मोठे बंदर असूनही तेथे स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. याठिकाणी पुरुषांसह महिलांचाही वावर असतो. स्वच्छतागृह नसल्याने या सर्वांची गैरसोय होत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देताना कामगार खलाशी संघटनेचे सहकारी नेते हुसेन मिरकर, सईद मस्तान, आसीद मुकादम, इमाम चौधरी होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 01/Oct/2025














