Khed : सतीचा कोंड येथे घरफोडी; सोन्याच्या दागिन्यांसह २ लाखांचा ऐवज लंपास

खेड : तालुक्यातील खवटी, सतीचा कोंड येथे घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. भाड्याने राहणाऱ्या दोघांनीच घरमालकिणीच्या घरातून सोन्याचे दागिने व घरगुती साहित्य चोरून नेल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता दीपक शिंदे (४३, रा. खवटी, सतीचा कोंड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, आशिष तुळशीराम दोडके व स्वरुपा आशिष दोडके (दोघे रा. सतीचा कोंड) यांनी १५ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत चोरी केली. त्यांच्या घरातून सुमारे २ लाख ४ हजार ७०० रुपयांचा ऐवज लंपास केला यात १ लाख २० हजार रुपयांचा सोन्याचा लक्ष्मीहार (१५ ग्रॅम ८८० मिलि), ४० हजाराची सोन्याची चेन (५ ग्रॅम ३२० मिलि), ४० हजाराची सोन्याची अंगठी (५ ग्रॅम), ३५०० रुपयांची भांडी, १२०० रुपयांचा गॅस सिलिंडर व गॅस शेगडी असा ऐवज समाविष्ट आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 01/Oct/2025