Sangameshwar : वांद्री येथील म्हात्रे कंपनीच्या क्रशरवरील सुपरवाझरचा हृदयविकाराने मृत्यू

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील जे. एम. म्हात्रे कंपनीच्या क्रशरवर काम करणाऱ्या सचिन सखाराम घोसाळकर या ५३ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे आरवली ते तळेकांटे रस्त्याचे काम करणाऱ्या जे. एम. म्हात्रे कंपनीच्या वांद्री येथील क्रशरवर सुपरवायझर म्हणून खेड तालुक्यातील बोरज घोसाळकरवाडी येथील सचिन घोसाळकर हे गेली पाच वर्षे काम करत होते.

सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास नाश्ता केल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्याने रूममधील समीर शशिकांत सांडव याने व इतर कामगारांनी १०८ रुग्णवाहिकेने जवळच्या वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून अधिक उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्याच्या दिलेल्या सल्ल्यानुसार त्याच रुग्णवाहिकेने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणले व त्याठिकाणी डॉ. मोरे यांनी तपासून ते मृत असल्याचे घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 01/Oct/2025